Shri Vithobachi Aarati विठोबाची आरती
Shri Vithobachi Aarati Shri Vithobachi Aarati is in Marathi. God Vitthal is standing on a brick for about 28 centuries. He is not alone but on his left side Rakhamai is also there. He is waiting for his devotee Pundarik. Bhima river is flowing at his feet which is washing sins of the devotees who take a bath in the river. God has garlands of tulasi. he has kept his hands on his west.
विठोबाची आरती
युगें अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्यावल्लभा पावे जिवलगा ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥
तुळसीमाळा गळां कर ठेवोनि कटीं ।
कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटीं ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढें उभे राहती ॥ २ ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्यावल्लभा पावे जिवलगा ।
जय देव जय देव ॥
धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळें वनमाळा गळां ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओंवाळिती राजा विठोबा सांवळा ॥ ३ ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्यावल्लभा पावे जिवलगा ।
जय देव जय देव ॥
ओंवाळूं आरत्या कुर्वंड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनियां देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥ ४ ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्यावल्लभा पावे जिवलगा ।
जय देव जय देव ॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती ।
दर्शन हेळामात्रें तया होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥ ५ ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्यावल्लभा पावे जिवलगा ।
जय देव जय देव ॥
Shri Vithobachi Aarati
विठोबाची आरती